वहागाव : पती- पत्नीचे नाते हे अतूट आणि एकमेकांचे आयुष्य व्यापून टाकणारे असते. चुकूनही मी तुझा हात सोडणार नाही, असे वचन एकमेकांना देत ते निभवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात; पण मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडत नाहीत, अशा काही अपवादात्मक घटना कुठेतरी घडल्याचे कानावर पडते. तळबीडलाही काल (गुरुवार) अशीच घटना (Karad Elderly Couple Death) घडली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांतच पत्नीनेही श्वास सोडल्याने हळहळ व्यक्त झाली.