

MLA Dr. Atul Bhosale
कऱ्हाड - येथील विमानतळ विस्ताराचे काम सुरू असून, पाच हजार फुटांची नवीन धावपट्टी तयार केली जात आहे. त्यामुळे मध्यम आकाराची जेट विमाने येथे उतरू शकतील. मात्र, त्या परिसरातील विकासकामांनाही काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने त्यावरही शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केली.