आमदार झाल्यानंतर कोविडच्या साथीत हजारो रुग्णांचे स्वखर्चाने वाचवलेले प्राण, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मतदारसंघात केलेली हजारो कोटींची विविध विकासकामे, जनतेच्या संपर्काच्या जोरावर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी सलग दुसऱ्यावेळी महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव करत पुन्हा एकदा आमदारकी पदरात पाडून घेतली आहे.