Koyna Dam
Koyna Damsakal

कऱ्हाड : कोयना ६० वर्षांत ५२ वेळा पूर्ण क्षमतेने

नऊ वेळा कमी क्षमतेच्या पाणीसाठ्याची नोंद

कऱ्हाड : पावसाळा सुरू झाला की, कोयना धरण कधी भरणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातही कोयनेच्या पाणीपातळीकडे लक्ष असते. कोयना धरण स्थापनेपासून सुमारे ५२ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तितक्याच वेळी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले आहे. अवघ्या नऊ वेळा धरण कमी क्षमतेने भरल्याचीही नोंद आहे. गेल्या वर्षापेक्षा पाऊस कमी असल्याने यंदा दरवाजे केव्हा उघडतील, याचा नेम नाही. मात्र, मागील वर्षापेक्षा कोयना धरणात यंदा २६.५७ टीएमसी पाणीसाठा घटवल्याचेही वास्तव आहे.

कोयना धरण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशसाठी महत्त्‍वाचे आहे. त्यामुळे पावसाळ्यात तिन्ही राज्ये धरणाचा पाणीसाठ्यावर लक्ष ठेवून असतात. धरणाच्या उभारणीपासून आजअखेर सुमारे ५२ वेळा कोयना धरण पूर्ण क्षमेतेने भरले आहे. यंदाचा पाणीसाठा ६४ टीएमसी आहे. गेल्या वर्षी तोच ९० टीएमसी होता. कोयना धरणाला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान, केवळ नऊ वेळा साठवण क्षमतेपेक्षा धरणातील पाणीसाठा कमी राहिला. मात्र, तरीही उपलब्ध पाण्यात सिंचनासह विजेचा प्रश्न मार्गी लागल्याच्या नोंदी आहेत.

कोयना धरणाचा मृत पाणीसाठा ५.२५ टीएमसी आहे. ३२.५० टीएमसी पाणीसाठा सिंचन, तर ६७.५० टीएमसी पाणीसाठा वीज निर्मितीसाठी वापरला जातो. कोयनेचे तांत्रिक वर्ष एक जून ते ३१ मे आहे. पाण्याची सध्याची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. सुमारे १२ लाख २३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. धरणाची साठवण क्षमता २००३ मध्ये ९८.७८ वरून वाढवून १०५.२५ टीएमसी केली. दोन वेळा लेक टॅपिंग तंत्राचाही वापर केला आहे.

यंदा पाऊस अन् पाणीसाठाही घटला...

गेल्या वर्षी २६ जुलै २०२१ तुलनेत यंदा कोयना धरणात सुमारे २६.५७ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी कोयना धरणाचा पाणीसाठा ९०.६७ टीएमसी होता. यंदा कोयना धरणात केवळ ६४.१० टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी कोयनेचे दरवाजे २२ जुलै रोजीच उघडले होते. ते सलग चार दिवस साडेपाच फुटांवर स्थिर होते. धरणात प्रति सेकंद सरासरी ३३ हजार २६६ क्युसेक पाण्याची आवक होती, तर प्रति सेकंद ३३ हजार २६६ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. यंदा पाऊस कमी आहे. दरवाजेही कधी उघडतील, हे निश्चित नाही. धरणात प्रति सेकंद केवळ १३ हजार ११३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

...यावर्षी होता धरणात कमी पाणीसाठा वर्ष पाणीसाठा

(टीएमसीमध्‍ये)

१९६८ ९४.०२०

१९७२ ८९.५९७

१९८७ ९१.२३६

१९८९ ९८.९८६

१९९५ ९५.७८९

२००० ९१.१२४

२००३ ९३.२७१

२०१५ ९४.३५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com