

कऱ्हाड : येथील रेव्हिन्यू क्लब परिसरातील बहुचर्चित गाळ्यांचे अतिक्रमण पालिकेने आज जेसीबीच्या मदतीने पाडले. तेथील नागरिकांनीही स्वतः तेथील काही अतिक्रमणे हटवली. पालिकेने पाडलेल्या अतिक्रमणांत चार गाळ्यांसहित दोन चहाच्या टपऱ्यांचा समावेश आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने आज अतिक्रमणांवर हातोडा टाकला. त्यासंदर्भात न्यायालयीन दावाही सुरूच होता. मात्र, त्यात समोरील पक्षाने माघार घेतल्याने पालिकेने त्वरित आज अतिक्रमणांवर हातोडा टाकून ती हटवली.
रेव्हिन्यू क्लबची येथील तहसीलदार कार्यालयाच्या बाजूलाच इमारत आहे. त्या इमारत परिसरात अनेक दिवसांपासून गाळ्यांचे बांधकाम केले होते. तेथे चार गाळे बांधले होते. ते अनधिकृत होते. त्यावर पालिकेने कारवाई केली. तेथील संबंधित गाळेधारकांनी गाळे स्वतः हटवले. पालिकेने त्यांना ती पूर्णपणे काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही वर्षे या ठिकाणी अतिक्रमणांवरून न्यायालयात वाद सुरू होता. मात्र, ज्यांनी दावा दाखल केला होता, त्यातून माघार घेतल्यानंतर पालिकेने आज त्या अतिक्रमणांवर हातोडा घालत ती अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमणावरून कायदेशीर प्रक्रियेची तांत्रिक अडचणी संपल्यानंतर त्वरित झालेल्या कारवाईची शहरात चर्चा आहे. कायदेशीर प्रक्रिया स्थगित होताच पालिकेने त्या संबंधितांना दोन दिवसांपूर्वी पूर्वसूचना दिली. त्यांना नोटिसीव्दारे आजअखेरची मुदत होती. सकाळी अकरा वाजता मुदत संपताच पालिकेने त्यांची यंत्रणा आणत ती अतिक्रमणे हटवण्यास सुरवात केली.
पालिकेने आज सकाळी नगररचना अधिकारी अंकिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली थेट कारवाईस सुरुवात केली आहे. त्या ठिकाणी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही भेट दिली. बांधकाम विभागाचे रोहन ढोणे, सचिन कोकणे, विजय गेंगजे, दिनकर गायकवाड, तोफिक शेख, मोहन जाधव यांनी कारवाईत भाग घेतला. एक जसीबीही तेथे आणण्यात आला होता. तेथील चहाची चपरी, इमारतीत उभारलेले तीन गाळे, त्या भागातील एक गाळा यावेळी हटविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.