कऱ्हाड, फलटण, खटावला वाढणार दोन गट

गट, गणांचा पुनर्रचना आराखडा तयार; दहा तारखेला आयोगाला होणार सादर
सातारा जिल्हा परिषद
सातारा जिल्हा परिषदsakal

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघाचा कच्चा पुनर्रचना आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात गटांची संख्या ७४ होणार असून, फलटण, खटाव, कऱ्हाड या तालुक्यांत दोन गट वाढणार आहेत. खंडाळा, महाबळेश्वर, माण आणि जावळीत ‘जैसे थे’ परिस्थिती राहणार आहे. येत्या गुरुवारी (ता. दहा) हा कच्चा पुनर्रचना आराखडा आयोगाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर यामध्ये काही बदल करून तो प्रसिद्ध केला जाईल. त्यावर हरकती, आक्षेपांनंतर दुरुस्ती करून मगच तो अंतिम केला जाणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांची संख्या राज्य सरकारने वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सातारा जिल्ह्यात सध्या असलेल्या गट व गणांची संख्या वाढणार आहे. सध्या जिल्हा परिषदेचे ६४ गट असून, त्यात दहाने वाढ होऊन ते ७४ होणार आहेत, तसेच गणांची संख्याही १४८ होणार आहे. यामध्ये विशेष करून मोठ्या गटांचे विभाजन केले जाणार आहे. वाढणाऱ्या गट व गणांच्या संख्येमुळे स्थानिक राजकीय नेत्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीत नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. सध्या वाढलेल्या गट, गणनिहाय मतदारसंघाचा कच्चा पुनर्रचना आराखडा निवडणूक शाखेने तयार केला आहे. त्यानुसार ७४ गटांची संख्या डोळ्यासमोर ठेऊन रचना केली आहे. हा आराखडा येत्या गुरुवारी निवडणूक शाखेकडून आयोगाला सादर केला जाणार आहे. यामध्ये आयोग काही बदल करून त्यांची प्रसिद्धी केली जाईल. त्यानंतर त्यावर हरकती, आक्षेप घेऊन त्यामध्ये बदल होतील. त्यानंतर अंतिम आराखडा तयार होऊन आरक्षणे टाकली जाणार आहेत.

त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या तयार केलेल्या कच्च्या आराखड्यानुसार फलटण, खटाव, कऱ्हाड येथे प्रत्येकी दोन गट व चार गण वाढणार आहेत, तर कोरेगाव, सातारा, वाई, पाटण येथे प्रत्येकी एक गट व प्रत्येक गटनिहाय दोन गण वाढतील, तसेच खंडाळा, महाबळेश्वर, माण व जावळीतील गट, गणांची संख्या ‘जैसे थे’ राहणार आहे.

तालुकानिहाय गटसंख्या व वाढणारे गट...

  • फलटण (७) दोन

  • खटाव (६) २

  • कोरेगाव (५) १

  • सातारा (१०) १

  • कऱ्हाड (१२) दोन

  • पाटण (७) एक

  • वाई (४) एक

  • खंडाळा (३)

  • महाबळेश्वर (२)

  • माण (५)

  • जावळी (३)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com