कऱ्हाड : पावसामुळे सह्याद्री कारखान्याचे गाळप बंद

ऊसतोड मजुरांच्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
पावसामुळे सह्याद्री कारखान्याचे गाळप बंद
पावसामुळे सह्याद्री कारखान्याचे गाळप बंदSakal

कऱ्हाड : वातावरणातील बदलामुळे पडत असलेल्‍या अवकाळी पावसाने ऊसतोडी ठप्प झाल्या आहेत. त्याचा परिणाम ऊस गाळपावर झाला आहे. ऊसाची आवक बंद झाल्‍याने आणि साखर कारखान्यातील बगॅस भिजल्‍याने ऊसाचे गाळप बंद करण्याची वेळ यशवंतनगर (जि.सातारा) येथील सह्याद्री कारखान्यांवर आली आहे. दरम्यान कारखाना प्रशासनाकडुन सुमारे एक हजार ऊसतोड मजुरांना सुरक्षीतस्थळी निवारा देण्यात आला आहे. त्यामुळे मजुरांनी समाधान व्यक्त केले.

कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वातावरणात बदल होवुन काल बुधवारी सायंकाळपासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका ऊसपिकाला बसला आहे. सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरु असल्याने ऊसतोडीसाठी मजुर विविध भागातुन कारखाना कार्यक्षेत्रात आले आहेत. ते झोपडी करुन राहतात. कालपासुन सुरु असलेला पाऊस रात्रभर बरसला. त्यामुळे मजुरांच्या झोपड्यांत पाणी गेले.

पावसामुळे सह्याद्री कारखान्याचे गाळप बंद
नंदुरबार : पात्र नागरिकांचे लसीकरण करावे - जिल्हाधिकारी

काहींचे साहित्यही त्या पाण्यात तरंगत होते. दरम्यान सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्‍थळावर तोडणी मजूरांची सुमारे एक हजार कुटूंबे खोप करून राहत आहेत. मध्यरात्री पडलेल्‍या पावसाचे पाणी त्‍यांच्या खोपीमध्ये शिरून, अन्न धान्य, कपडे यांसह घरगुती साहित्य भिजून गेले. कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यस्‍थळावरील यशवंतराव चव्हाण विद्यालय, हनुमान मंदिर, विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर, साखर शाळा इमारत आदि ठिकाणी या मजूरांच्या तात्पुरत्‍या निवाऱ्याची व्यवस्‍था करण्यात आली आहे.

त्यांना तातडीने खाद्यपदार्थांचे वाटप कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, मुख्य शेती अधिकारी मोहनराव पाटील, उप शेती अधिकारी नितीन साळुंखे, ऊस विकास अधिकारी, केनयार्ड सुपरवायझर, कर्मचारी यांनी केले. जळण भिजल्याने त्यांना इंधनासाठी कारखान्यातील लुज बगॅस उपलब्‍ध करून देण्यात आलेला आहे. कारखान्याने केलेल्या या व्यवस्थेबपद्दल मजुरांनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com