

Karad South Assembly constituency has become the first in Pune Division and the seventh in Maharashtra to complete 100% work under the Election Commission's Special Intensive Revision (SIR) of the electoral rolls.
Sakal
कऱ्हाड : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने मतदार यादीचे १०० टक्के कामकाज पूर्ण करून पुणे विभागातील पहिला तर महाराष्ट्रातील सातवा मतदारसंघ होण्याचा मान पटकावला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाल्याची माहिती मतदान नोंदणी अधिकारी तथा कऱ्हाडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.