Kelghar Ghat Landslide : चालक अजरुद्दीनच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव! केळघर घाटात जेसीबीवरच मोठी दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्ग पूर्णपणे ठप्प

Kelghar Ghat landslide latest news : साताऱ्यातील केळघर घाटात दरड हटवताना जेसीबीवर मोठी दरड कोसळली. चालकाने वेळेवर उडी मारून जीव वाचवला. महाबळेश्वर-सातारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
JCB trapped in Kelghar Ghat landslide

JCB trapped in Kelghar Ghat landslide

esakal

Updated on

केळघर (जि. सातारा) : केळघर-महाबळेश्वर घाटात दरड हटविण्याचे काम सुरू असताना सोमवारी (ता. २७) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. काळ्या कड्याजवळ अचानक जेसीबीवर दरड कोसळल्याने जेसीबी दरीच्या दिशेने घसरला. मात्र, चालक अजरुद्दीन याने प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे महाबळेश्वर, केळघर, मेढा आणि सातारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली (Mahabaleshwar road blocked due to landslide) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com