
खंडाळा : पुणे- बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास कोंबडीचे खाद्य घेऊन भरधाव वेगात जाणारा ट्रक पलटी झाला. घाटालगत असणाऱ्या धोम - बलकवडी कालव्यात हे कोंबडीचे खाद्य पडल्याने पाणी दूषित झाले. या अपघातात चालक चरामप्रीत कुमार (वय ३० रा. उत्तर प्रदेश) हा जखमी झाला आहे.