Khambatki Ghat traffic jam latest news
esakal
खंडाळा (जि. सातारा) : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सहाव्या वळणावर मालाने भरलेला ट्रेलर बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा (Pune-Satara Highway traffic jam today) झाला. या घटनेमुळे घाटमार्गावर अडीच ते तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर खंडाळा आणि भुईंज महामार्ग पोलिसांनी प्रयत्न करून ट्रेलर बाजूला केल्यानंतर सायंकाळी उशिरा वाहतूक पूर्ववत झाली.