खंबाटकी घाटात तीन तास कोंडी, वाहनांच्या लांबलचक रांगा

खंबाटकी घाटात तीन तास कोंडी, वाहनांच्या लांबलचक रांगा

खंडाळा (जि. सातारा) : खंबाटकी घाट माथ्यावरील दत्तमंदिराजवळ शुक्रवारी मालट्रक अडकल्याने घाट तीन तास जाम झाला होता. या वेळी घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाटात नेहमी वर्दळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

खंबाटकी घाट चढताना दत्त मंदिराजवळ मालट्रकचे ब्रेक फेल झाल्याने व येथे चारपदरी रस्त्याचे काम रखडल्याने तेथे दोन पदरी रस्ता आहे. यामुळे येथे वाहनांची कोंडी झाली. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड व खंडाळा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. हा घाट सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत जाम होता. 

खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ पहायला मिळते, तसेच हा घाट वळणा-वळणाचा असल्याने यातून मार्ग काढताना अनेकांच्या जिव्हारी येते. या घाटात मोठ्या संख्येने अपघातही होत असतात, त्यामुळे वाहनांचा वेग अगदी मंद पहायला मिळतो. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com