esakal | सिगारेट पिण्यासाठी जबरदस्तीने 300 रुपये घेतले काढून; शिरवळात दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Khandala police

पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या तपास पथकाने संशयित आरोपीस तत्काळ जेरबंद केले.

सिगारेट पिण्यासाठी जबरदस्तीने 300 रुपये घेतले काढून

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (सातारा) : येथे बाजारपेठेत दहशत दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील आतिषभाई ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे (वय १९) व सिद्धांत दत्तात्रय खडसरे (वय २१) शिरवळ पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केले. यातील एक जण फरारी झाला आहे. यानंतर संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शिरवळ येथे कंपनीची खासगी बस (एमएच १२ एफझेड ८२९०) अडवून गाडीची चावी घेऊन सिगारेट पिण्यासाठी जबरदस्तीने खिशातील ३०० रुपये काढून घेण्याचा प्रकार घडला होता. सचिन गुंजवटे यांच्या गाडीच्या समोरील काचाही फोडल्या. या वेळी पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या तपास पथकाने संशयित आरोपीस तत्काळ जेरबंद केले. या कामगिरीमुळे शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने व तपास अधिकारी वृषाली देसाई व सहकाऱ्यांचे जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा: पुणे-बंगळूरु NH-4 महामार्गावर कर्नाटकचा तेलाचा ट्रक पलटी;पाहा व्हिडिओ

loading image
go to top