

Bombay High Court Issues Directions on Posthumous Padma Award for Khashaba Jadhav
कऱ्हाड : ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याच्या मागणीला न्यायालयीन बळ मिळाले आहे. मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तीचे निधन एक वर्षाच्या आत झालेले असावे, अशी कोणतीही अट नियमावलीत नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारच्या संबंधित समितीला राज्य सरकारच्या शिफारशीचा योग्य विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.