

Kisan Veer college girls shine on Satara All India Radio
Sakal
वाई : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सातारा आकाशवाणी केंद्रावर आपल्या वक्तृत्व, गायन आणि स्वरचित कविता या कौशल्याची चमक दाखवत रसिक श्रोत्यांची मने जिंकली. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करण्याची मिळालेली ही संधी विद्यार्थिनींनी आपल्या दर्जेदार सादरीकरणाने सार्थ ठरवली. शुक्रवारी (ता. २३) सकाळी साडेनऊ वाजता प्रसारित झालेल्या या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे वाई आणि सातारा जिल्ह्यातील श्रोत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.