किसनवीरची सत्ता दिल्यास प्रतापगड कारखाना जावलीकरांच्या स्वाधीन करणार - मकरंद पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kisanveer sugar factory power Pratapgad factory will handed over to Jawalikars Makrand Patil satara

किसनवीरची सत्ता दिल्यास प्रतापगड कारखाना जावलीकरांच्या स्वाधीन करणार - मकरंद पाटील

कुडाळ - किसनवीर कारखाना एकेकाळी जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्टाचे वैभव म्हणून परिचित होते,अनेक दिग्गज मानयवरांनी या कारखान्याचे नेतृत्व केले व कारखान्याला नावारूपास आणले, मात्र हाच किसनवीर कारखाना आता सत्ताधाऱ्यांच्या भष्ट व नियोजनशुन्य कारभारामूळे अखेरच्या घटका मोजतो आहे, किसनवीरची निवडणुक ही मकरंद पाटलांच्या भविष्याची निवडणुक नाही तर किसनवीर, खंडाळा व प्रतापगड अशा तीन कारखान्यांच्या 65 हजार शेतकरी सभासदांच्या भवितव्याची ही निवडणुक आहे.

कीसनवीरच्या सध्याच्या ढिसाळ व्यवस्थापनाने स्वताबरोबरच प्रतापगड कारखानाही बंद ठेवून जावलीतील शेतकरी सभासदांना अडचणीत आणले आहे, एकवेळ प्रतापगड भंगारात गेला तरी चालेल पण प्रतापगडच्या संचालक मंडळाला तो परत देणार नाही असे खाजगीत विद्यमान अध्यक्ष बोलत आहेत, हे वास्तव जावलीकरांना समजणे गरजेचे असून उद्याच्या निवडणुकीत सभासदांनी आमच्या हातात किसनवीरची सत्ता दिल्यास सभासदांच्या मालकीचा असणारा प्रतापगड कारखाना जावलीकरांच्या ताब्यात तात्काळ स्वाधीन करणार हा शब्द सभासदांना देत असल्याचा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी कुडाळ ता. जावली येथील सभेवेळी बोलताना व्यक्त केला.

किसनवीर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेवेळी ते बोलत होते, यावेळी जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगडचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, जावली बँकेचे अध्यक्ष राजाराम आोंबळे, उमेदवार हिंदुराव तरडे, रविंद्र परामणे, पांडुरंग जवळ यांच्यासह जावली तालुक्यातील अऩेक मान्यवर शेतकरी, सभासद उपस्थित होते, पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, कीसनवीर कारखान्याचे वैभव गेल्या काही वर्षात विद्यमान अध्यक्षांनी धुळीला मिळवण्याचे काम केले असून, केवळ खोटा दिखाउपणा व व डामडैाल करण्याच्या नादात संस्थेवर 750 केटी रूपयांचा कर्जाचा डोंगर उभा करून संस्था बुडवण्याचा घाट घातला आहे, कारखान्यावर नवनविन प्रकल्प उभे करणाच्या नावाखाली कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांनी केला आहे, गेल्या 22 महिन्यांपासून कामगारांना पगार दिलेले नाहीत, शेतकऱ्यांने घाम गाळून कष्टाने पिकलेल्या उसाचे बिल दिले नाही, गेल्या तीन वर्षांपासून प्रतापगड कारखानाही बंद ठेवला आहे.

त्यामुळे जावलीतील शेतकर्यांचा उसाचा मोठा प्रश्न उभा राहीला आहे, प्रतापगडच्या कामगारांचेही पगार थकवले आहेत, प्रतापगडशी झालेला करार विद्यमान संचालक मंडळाने पाळला नाही, प्रतापगडच्या व्यवस्थापनाने सातत्याने आमचा करार मोडून कारखाना आमच्या ताब्यात परत करण्याची मागणी करूनसुध्दा तो जाणिनवपुर्वक हेतूने अद्याप पर्यंत दिला नाही, सोळा वर्षातील आठ वर्षे कारखाना वापरूनसुध्दा प्रतापगच्या व्यवस्थापनाकडे अवास्तव हिशोबाची मागणी केली जात आहे शिवाय प्रतापगड कारखान्याच्या मालमत्तेवरही आणखी कर्ज काढून प्रतापगडला आडचणीत आणण्याचा प्रयत्न किसनवीरच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे, त्यामुळे जावलीतीस शेतकरी सभासदांनी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवायची वेळ आता आली असून कारखाना बचाव शेतकरी पँनेलच्या सर्व उमेदवांरांना निवडून देऊन आमच्या हातात सत्ता दिल्यास तात्काळ प्रतापगडचा करार रितसर मार्गाने मोडून सभासदांच्या मालकीचा असणारा प्रतापगड कारखाना सन्मानाने जावळीकरांच्या स्वाधीन करू असा शब्द या सभेच्या निमित्ताने देत आहे, आम्ही दिलेला शब्द पाळून जावलीकरांच्या मतांची परतफेड करू असा विश्वसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वसंतराव मानकुमरे, सदाशिव सपकाळ व सैारभ शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रतापगड कारखान्याचा करारा मोडून आमचा कारखाना आम्हाला परत करावा अशी मागणी केली. जावली बँकेचे संचालक शिवाजीराव नवसरे यांनी प्रस्ताविक केले तर जावलीतील उमेदवार हिंदुराव तरडे यांनी आभार मानले.

Web Title: Kisanveer Sugar Factory Power Pratapgad Factory Will Handed Over To Jawalikars Makrand Patil Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top