
कोरेगाव : अगदी बारा महिने, अठरा काळ अवकाशात वा आपल्या घरादारांसमोर स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या छोट्या- मोठ्या पक्ष्यांना आता रणरणत्या कडक उन्हाच्या झळा बसू लागण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर या पक्ष्यांना ‘थोडं पाणी अन् थोडे अन्न’ देण्याचा उपक्रम येथील इनरव्हील क्लबने सुरू केला असून, त्याबरोबर प्रबोधनही सुरू केले आहे.