नगरपंचायतीसाठी NCP आमदार शिंदे विरुद्ध सेनेच्या महेश शिंदे गटांत सामना?

Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Summary

ही निवडणूक राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपकडून पक्षाच्या चिन्हावर लढवली जाणार, की स्थानिक आघाड्या होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झालीय.

कोरेगाव (सातारा) : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Koregaon Nagar Panchayat Election) जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या गटाविरुद्ध आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांचा गट ताकदीने उतरणार असून, ही निवडणूक राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shivsena), भाजपकडून (BJP) पक्षाच्या चिन्हावर लढवली जाणार, की स्थानिक आघाड्या होणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष उतरले होते; परंतु, त्यावेळी खरी लढत काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येच झाली होती. राष्ट्रवादीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी नगरपंचायतीची पहिली निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यावेळी १७ पैकी नऊ जागा मिळवून राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली होती. पहिल्या ‘टर्म’मध्ये राष्ट्रवादीने राजाभाऊ बर्गे यांना नगराध्यक्षपदी, तर जयवंत पवार यांना उपाध्यक्षपदी संधी दिली. वर्ष-दोन वर्षे आलबेल होते; परंतु त्यानंतर मात्र कोणता नगरसेवक कोणत्या बाजूला आहे, हे समजण्यापलीकडची स्थिती निर्माण झाली. नंतरच्या ‘टर्म’मध्ये आघाडीचा प्रयोग झाला आणि नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रेश्मा कोकरे यांना संधी मिळाली. उपाध्यक्षपदी काही काळ राष्ट्रवादीच्या संगीता बर्गे व त्यानंतर मंदा बर्गे यांना संधी मिळाली. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे व महेश शिंदे यांचा सामना झाला आणि महेश शिंदे आमदार झाले. या निवडणुकीतच शहरातील राजकीय समीकरणे बदलल्याने राष्ट्रवादी व काँग्रेस, या दोन्ही पक्षांमधील काही नगरसेवक महेश शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. दरम्यान, नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्षा व राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा असतानाही पहिल्या ‘टर्म’च्या तुलनेत दुसऱ्या ‘टर्म’मध्ये आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे दिसू लागली. त्यानिमित्ताने आमदार महेश शिंदे यांनीही राजाभाऊ बर्गे, महेश बर्गे, राहुल बर्गे, सुनील बर्गे आदींच्या साथीने शहरात जनसंपर्क प्रस्थापित केला. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

Shashikant Shinde
आमदार गोरेंनी गद्दारी करत काँग्रेस पक्ष सोडला : रणजितसिंह देशमुख

विद्यमान उपाध्यक्षा मंदा बर्गे यांचा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी पुन्हा आरक्षित झाला आहे. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव, तर विद्यमान नगराध्यक्षा रेश्मा कोकरे यांचा प्रभाग खुला झाला असून, माजी उपाध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक महेश बर्गे आदींसह अनेक नगरसेवकांचे प्रभाग विविध प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी पुन्हा इच्छुक असलेल्या अनेक विद्यमानांवर सुरक्षित प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. नगरसेविका अर्चना बर्गे यांचा प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी, तर पूनम मेरूकर यांचा प्रभाग क्रमांक सहा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. नगरसेविका शुभांगी बर्गे यांचा प्रभाग सर्वसाधारण खुला झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाविरुद्ध आमदार महेश शिंदे यांचा गट ताकदीने उतरणार आहे. दोन्ही आमदारांनी आपापल्या समर्थकांसमवेत बैठकांचे सत्र सुरू करून व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केला आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपकडून पक्षाच्या चिन्हावर लढवली जाणार, की स्थानिक आघाड्या होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Shashikant Shinde
'भाजपकडून मला आमदारकीसाठी तिकीट देण्याची ऑफर'

खुल्या प्रवर्गासाठी रस्सीखेच

प्रभाग क्रमांक दोन, सात, दहा, १४, १६, हे पाच प्रभाग सर्वसाधारण खुले झाले आहेत. त्यामुळे या प्रभागांतून लढण्यासाठी दोन्ही आमदारांच्या समर्थकांसह सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. त्याखालोखाल सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या प्रभाग क्रमांक तीन, आठ, नऊ, ११, १३, १५ या प्रभागांमध्येही उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.

Shashikant Shinde
भाजपकडून तृणमूलसह डाव्यांचा सुपडासाफ; त्रिपुरात मिळवल्या 334 पैकी 329 जागा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com