कोरेगाव : महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन होत असतानाच, कोरेगाव येथे साकारण्यात आलेले ३६ फुटी उंच शिवलिंग तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त याची निर्मिती करण्यात आली आहे.