सातारा जिल्ह्यातील पाच ग्रामपंयाचतीची सरपंच निवड स्थगित

सातारा जिल्ह्यातील पाच ग्रामपंयाचतीची सरपंच निवड स्थगित
Updated on

सातारा : मुंबई उच्च न्यायालयाने सातारा, सांगली व कोल्हापुर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीस शुक्रवारी (ता.५) स्थगिती दिली आहे. आपल्या गावातील सरपंच निवडी पुढे जाणार की काय अशा चर्चा गावोगावच्या पारावर रंगल्या. दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीस जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्थगिती दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्‍यातील कठापूर, फलटण तालुक्‍यातील जावळी, माण तालुक्‍यातील पिंगळी (बु.), खटाव तालुक्‍यातील सातेवाडी व कऱ्हाड तालुक्‍यातील पोतले या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालय येथे याचिका दाखल झाल्या. सरपंचपदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम 30 (5) व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियमानुसार तालुकानिहाय काढण्यात आल्याने उच्च न्यायालयाच्या ता. 5 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशानुसार कोरेगाव, फलटण, माण, खटाव व कऱ्हाड या तालुक्‍यातील ता. 8 ते 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडी ता. 16 फेब्रुवारीपर्यंत रोखून ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. 

उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतीच्या याचिकाकर्त्यांची व हितसंबंधितांची याचिका कर्त्यांच्या अर्जावरील सुनावणी मंगळवार (ता. 9 ) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे घेण्यात येणार आहे. या तालुक्‍यांव्यतिरिक्त उर्वरित सहा तालुक्‍यांमध्ये (सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, खंडाळा व पाटण) ग्रामपंचायतींच्या ता. 8 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडी यापूर्वी देण्यात आलेल्या नमूद आदेशानुसार पार पाडण्यात याव्यात, असे आदेशही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. 

शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाचा ठरलं

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com