Shambhuraj Desai : कायदा हातात घेतल्यास कारवाई करणार; साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाईंचा राजु शेट्टींना इशारा

कोयना धरणावर येऊन पाणी सोडण्याच्या राजू शेट्टी यांच्या इशाऱ्याबाबत मंत्री देसाई यांनी कडक भूमिका मांडली.
shambhuraj desai and raju shetty

shambhuraj desai and raju shetty

sakal

Updated on: 

कऱ्हाड - कोयना धरणातील पाणीसाठ्याची वस्तुस्थिती राजू शेट्टी यांना माहिती नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तब्बल १६ टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी, जनावरांसाठीचे पाणी आणि त्यावर अतिरिक्त दहा टक्के कोटा राखीव ठेवून उर्वरित पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसारच आम्ही काम करत आहोत. दोन नोव्हेंबरला होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत चर्चा केली जाईल, असे स्पष्ट करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राजू शेट्टी यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com