मुंबई/ मोरगिरी : जिल्ह्यातील कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोयना धरण आणि जलाशय परिसर हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून, येथे पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी पर्यटनविषयक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये कोयनानगर येथील एमटीडीसी रिसॉर्टचा संपूर्ण कायापालट करून आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.