Koyna Dam 105.03 TMC water storage
esakal
कराड (जि. सातारा) : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण अखेर पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले (Koyna Dam water release 4232 cusecs) आहे. धरणात सध्या १०५.०३ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून त्यातून ३ हजार १८२ क्युसेक, तर पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्युसेक असा एकूण ४ हजार २३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.