कोयना धरणाचे दरवाजे बंद; पायथा वीजगृह सुरू

विजय लाड
Saturday, 17 October 2020

दोन दिवसांपासून उघडलेले धरणाचे दरवाजे बंद केले असले तरी पायथा वीजगृह सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे अखेर कोयना प्रशासनाने बंद केले आहेत.

कोयनानगर (जि. सातारा) : दोन दिवसांत कोयना धरणातून नदीपात्रात दोन टीएमसी पाणीसाठा सोडण्यात आला. दोन दिवसांपासून उघडलेले धरणाचे दरवाजे बंद केले असले तरी पायथा वीजगृह सुरू आहे. 

पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे अखेर कोयना प्रशासनाने बंद केले आहेत. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 4467 मिलिमीटर, नवजा 5176 तर महाबळेश्वर येथे 5190 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात 103.73 टीएमसी पाणीसाठा आहे. 

कऱ्हाड-पाटणात वरुणराजाचे रौद्ररुप, खरीप पिकांची मोठी हानी

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyna Dam Door Closed Satara News