Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Heavy Rain Lashes Koyna Catchment Area: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक सुरू झाली असून अवघ्या १२ तासांत ७८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Satara

Satara

esakal

Updated on

पाटण: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १२ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. धुवाधार बरसणाऱ्या पावसाने कोयना धरणातील पाणीसाठा आणि आवक यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान विभागाने आज रेड अलर्ट ज्वारी केला होता. त्यानुसार पश्चिम घाटावर पावसाने जोरदार हजेरी लावली. सह्याद्रीच्या रंगांमधील घाटमाथ्यावर, तसेच कोयना, पाथरपुंज या ठिकाणी अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com