esakal | कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं; गृहराज्यमंत्री आज करणार 'जलपूजन'
sakal

बोलून बातमी शोधा

कोयना धरण

धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पुन्हा एकदा दमदार पाऊस सुरु झाल्यामुळे धरण ओवरफ्लो होत आहे.

कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं; गृहराज्यमंत्री आज करणार 'जलपूजन'

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा): मुसळधार पाऊसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अगोदरच शंभर टक्के पर्जन्यमान झाल्यामुळे कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पुन्हा एकदा दमदार पाऊस सुरु झाल्यामुळे धरण ओवरफ्लो होत आहे. धरणात सध्या १०३.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी दमदार पाऊस सुरुच आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता संपत आल्याने वाढत जाणारी धरणाची जलपातळी धोकादायक होऊ नये, यासाठी धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वीत करून धरणाची जलपातळी नियंत्रित करण्याचा प्रयोग रविवार पासून कोयना प्रकल्प सुरु करत आहे.

हेही वाचा: पावसाळ्यातील पर्यटनाचे आगार कोयनानगर

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. चार महिन्यातील १०४ दिवसात १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात पाणलोट क्षेत्रात पडलेल्या धुवाँधार पाऊसाने धरणात १२७ टीएमसी पाणीसाठय़ाची आवक झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे ३९८२ मीमी नवजा येथे ५२२२ मीमी महाबळेश्वर येथे ५२९२ मीमी पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊसाने पुन्हा एकदा जोरदारपणे कमबँक केल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता संपत आली आसली तरी पाऊसाचा जोर कमी होत नसल्याने वाढत जाणारी धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचा पायथा वीज गृह कार्यान्वीत करण्यात येत आहे.

हेही वाचा: कोयनानगर : शिवसागरच्या बोटिंगसाठी "मानाईनगर स्पॉट' निश्‍चित

रविवारी सकाळी १० वाजता पायथा गृहाचे एक युनिट सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी दिली. धरणातून नदीपात्रात १०५० कूसेस्क पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणात १०० टीएमसी पाणीसाठा झाल्यावर कोयना धरणातील पाण्याचे विधीव्रत जलपूजन करण्यात येते. रविवारी सकाळी ११.०० वाजता गृहराज्यमंत्री तथा पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांच्या शुभ हस्ते धरणातील पाण्याचे जलपूजन करण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top