Koyna Dam latest water storage update
esakal
कराड (सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरातही पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. तब्बल २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ४०० मिलीमीटर (Mahabaleshwar 400 mm rainfall today), कोयनेला ३१९ मिलीमीटर आणि नवजा येथे २७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २४ तासांत कोयना धरणात तब्बल ८.३ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.