Rainfall has eased in the Koyna dam catchment area, reducing inflow. The dam now holds 92.49 TMC of water, while 24,908 cusecs are being released into the Koyna river through spillway gates and the powerhouse.
esakal
कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर आज मंगळवारी सकाळनंतर ओसरला आहे. आज शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासुन कोयनानगरला 7, नवजाला 29 आणि महाबळेश्वरला 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धऱणात येणाऱ्या पाणीसाठ्याचीही आवक कमी झाली आहे. धरणाचे दरवाजे चार फुटावर स्थिर आहेत. धरणात सध्या 92.49 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.