Rare Ganesh idol in Koyna Dam : ऋषी मुद्रेतील बैठक अन् 'ढोकरा शैली'! कोयना धरणाच्या गाळात सापडलेली दुर्मीळ गणेशमूर्ती नेमकी किती जुनी? उलगडणार जुन्या संस्कृतीचा वारसा

Rare Ganesh idol found in Koyna Dam : कोयना धरणातील पाणीपातळी घटल्यानंतर बामणोली-तापोळा परिसरात ढोकरा शैलीतील दुर्मीळ ब्राँझ गणेशमूर्ती आढळली. संशोधकांनी या शोधाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले आहे.
Rare Ganesh idol found in Koyna Dam

Rare Ganesh idol found in Koyna Dam

esakal

Updated on

कराड (सातारा) : मॉन्सूनच्या पावसाने यंदा महिनाभर उशिराने हजेरी लावली. मात्र, दरम्यानच्या काळात कोयनानगर (ता. पाटण, जि. सातारा) येथील कोयना धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती. त्यामुळे धरणासाठी विस्थापित झालेल्या गावातील काही अवशेष, काही मूर्ती या कोयना जलाशयाच्या (Koyna Dam) पात्रातून उघड्यावर आल्या. त्यामध्येच बामणोली-तापोळा परिसरातील कोरड्या पडलेल्या नदीपात्रात एक दुर्मीळ गणेशमूर्ती आढळून आली आहे. ऋषी मुद्रेतील बैठ्या आसनावरील ब्रांझ धातूची ही मूर्ती ढोकरा शैलीतील असल्याचे संशोधकांचे मत (Bronze Ganesh idol discovered in Maharashtra) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com