Koyna Dam Water Level : कोयना धरण 100 टक्के भरले! धरणातून 1,050 क्युसेक विसर्ग सुरू; कृष्णा-कोयना नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन

Koyna Dam 105.03 TMC water storage : कोयना धरण १०० टक्के भरले असून १०५.०३ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात २,३१५ क्युसेक आवक सुरू असून पायथा वीजगृहातून १,०५० क्युसेक विसर्ग होत आहे.
Koyna Dam Water Inflow Stands at 2,315 Cusecs

Koyna Dam Water Inflow Stands at 2,315 Cusecs

esakal

Updated on

कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी पावसाची रिपरिप कायम आहे. धरण सध्या पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले (Koyna Dam 100 percent full today) असून आज शनिवारी (ता. ५) सकाळी आठ वाजता धरणात 105.03 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून केव्हाही नदीपत्रात विसर्ग करण्यात येणार असून कृष्णा-कोयना नदीकाठी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com