Koyna Dam water level today
esakal
कराड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात गुरुवारी (ता.९) दुपारपासून पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सलग अनेक दिवसांच्या मुसळधार पावसानंतर नागरिकांना दिलासा मिळाला असून, कोयना धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीचा टप्पा ओलांडून ५१.७१ टीएमसीपर्यंत पोहोचला (Koyna Dam latest water storage update) आहे.