Koyna Dam Water Level : कोयना धरणात 98.35 टीएमसी पाणीसाठा; 2 ते 3 दिवसांत धरण 100 टीएमसी भरण्याची शक्यता, धरणाचे दरवाजे 1 फुटावर...

Koyna Dam Water Storage Reaches 98.35 TMC : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग घटवून 8,703 क्युसेक करण्यात आला आहे. धरणात 98.35 टीएमसी साठा असून पुढील दोन-तीन दिवसांत 100 टीएमसीची शक्यता आहे.
Koyna Dam Discharge Reduced to 8,703 Cusecs

Koyna Dam Discharge Reduced to 8,703 Cusecs

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला (Koyna Dam latest Update) आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे काल बुधवारी सकाळी 11 वाजता दोन फुटावरून एक फुटावर करून विसर्ग ही कमी करण्यात आला आहे. कोयना धरणातून सध्या 8 हजार 703 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. धरणात सध्या 98.35 टीएमसी पाणीसाठा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com