Koyna Dam latest water storage update
esakal
कराड (सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या तब्बल २४ तासात नवजाला सर्वाधिक १९२ मिलीमीटर, कोयनानगरला १५१ मिलीमीटर आणि महाबळेश्वरला १३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २४ तासात कोयना धरणात तब्बल ७.७३ टीएमसीने पाणीसाठा वाढला (Koyna Dam crosses 50 TMC latest update) आहे. दरम्यान, कोयना धरण आज (ता.९) गुरुवारी दुपारी ५० टीएमसी भरले आहे.