Koyna Dam Water Level : कोयना खोऱ्यात पाऊस गायब, धरणातील पाण्याच्या आवकेत मोठी घट; जुलै अखेरपर्यंत धरण भरणार का? दमदार पावसाची प्रतीक्षाच!

Koyna Dam Water Level Reaches 53.69 TMC : चार दिवस पाऊस थांबल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. जलसाठा ५३.६९ टीएमसीवर पोहोचला असून, धरण पूर्ण भरण्यासाठी पुढील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
Koyna Dam water level today July 2026

Koyna Dam water level today July 2026

esakal

Updated on: 

कराड (सातारा) : कोयना धरण परिसरात चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत मोठी घट झाली आहे. १४ जुलै रोजी सकाळी आठ वाजता धरणाची पाणीपातळी २१११ फूट ५ इंच (६४३.५६० मीटर) झाली (Koyna Dam latest water storage update) असून, धरणातील एकूण जलसाठा ५३.६९ टीएमसी (५१.०१ टक्के) इतका झाला आहे. मात्र, पाऊस थांबल्याने गेल्या आठवड्यातील वेगाने वाढणारा जलसाठा आता मंदावल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com