Koyna Dam reservoir live storage report July 2026
esakal
कराड (सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली (Satara monsoon rain latest water storage update) आहे. धरण सध्या 60 टक्के भरतीच्या उंबरठ्यावर पोहोचले असून सोमवारी (ता. 20) सकाळी 8 वाजेपर्यंत धरणात 58.89 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.