

Koyna Dam Live Update Navja Receives 123 mm Rain Water Storage at 92.49 TMC Gates Open Four Feet
esakal
-हेमंत पवार
कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवजा येथे 123 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर त्या तुलनेत महाबळेश्वर येथे 68 आणि कोयनानगर येथे 43 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण थोडे कमी असल्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही थोडी कमी झाली असून 24 तासात धरणातील पाणी पातळीत 2.30 टीएमसीने वाढ झाली असून धरणात सध्या 92.49 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.