Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

Koyna Dam Water Storage Reaches 104.28 TMC : कोयना धरणात 104.28 टीएमसी पाणीसाठा झाला असून पूर्ण क्षमतेसाठी 0.97 टीएमसी पाणी शिल्लक आहे. पाण्याची आवक वाढल्याने 1,050 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Koyna Dam Water Storage Reaches 104.28 TMC

Koyna Dam Water Storage Reaches 104.28 TMC

esakal

Updated on

कराड : कोयना धरण परिसरात पावसाची उघडझाप सुरू असून, धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. धरणात सध्या 104.28 टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 0.97 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास आज सायंकाळपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता (Koyna Dam 104.28 TMC water storage) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com