Koyna Dam 97.93 TMC water storage
esakal
कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. आज (ता. १८) सकाळी आठ वाजता धरणाची पाणीपातळी २१५७ फूट १० इंच झाली असून एकूण पाणीसाठा ९७.९३ टीएमसी (९३.०५ टक्के) झाला आहे. धरणात प्रतिसेकंद २० हजार ३०६ क्युसेक पाण्याची आवक होत (Koyna Dam water storage today) आहे.