Koyna Dam Water Level
esakal
कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसातील पावसाने धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. धरणात सध्या 103.73 टीएमसी पाणी साठा झाला (Koyna Dam Water Level Today) आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघ्या 1.52 टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातून आज रविवारी (ता. ३०) सकाळी 11 वाजता 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू करण्यात येणार आहे.