Koyna Dam Water level Today : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' अजूनही निम्म्यावरच! कोयना धरणात 51.21 टक्के पाणीसाठा, आजची स्थिती काय? वाचा ताजी अपडेट

Koyna Dam water level today : पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी असल्याने कोयना धरणातील पाणीसाठा ५१.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात पाण्याची आवक अत्यल्प असून जोरदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Koyna Dam water level today live

Koyna Dam water level today live

esakal

Updated on: 

कराड (जि. सातारा) : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत अधूनमधून पाऊस सुरू असला, तरी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आवश्यक असलेला जोरदार आणि सलग पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे राज्यासाठी जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत असला, तरी तो अद्याप निम्म्याच्या आसपासच (Koyna Dam live storage update) आहे. परिणामी, "कोयना धरण नेमके कधी भरणार?" हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com