Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे दरवाजे आज 10 वाजता 6 फुटांनी उचलणार; 32 हजारांहून अधिक क्युसेकने होणार विसर्ग, कृष्णा-कोयनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam discharge latest update : मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली असून धरणाचे दरवाजे सहा फूट उघडून 32,776 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Koyna Dam discharge August 2026

Koyna Dam discharge August 2026

esakal

Updated on: 

कराड (जि. सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज जलसागरासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळीतही मोठी वाढ होत (Koyna Dam discharge latest update) आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे आज शनिवारी (ता. १) सकाळी दहा वाजता सहा फुटाने उचलून कोयना नदीपात्रात 32 हजार 776 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com