

Koyna Dam released water through its spillway gates for the first time this monsoon after the reservoir level increased due to continuous rainfall.
Sakal
कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूटाने उघडून कोयना नदीपात्रात पाच हजार ७९ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या ८४.७७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.