Koyna Dam latest water level
esakal
कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना नगर व नवजा परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली (Koyna Dam water release latest update) आहे. गेल्या 24 तासांत 2.16 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच काल गुरुवारी (ता.३०) सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उचलून कोयना नदीपात्रात पाच हजार 79 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.