Koyna Dam Update : कृष्णा-कोयनाकाठच्या गावांची धडधड वाढली! रात्री 10 वाजता कोयनेचे दरवाजे 3 फुटांपर्यंत उचलणार; पाहा नदीपात्रात किती क्युसेकने पाण्याचा विसर्ग?

Koyna Dam water release today : कोयना पाणलोटात ढगफुटीसदृश्य पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे धरणाचे दरवाजे तीन फूट उघडून १७,५८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Koyna Dam discharge live update
  1. Koyna Dam discharge live update

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज जलसागरासह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळीतही मोठी वाढ होत (Koyna Dam gate opening latest update) आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे आज शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी पाच वाजता दोन फुटापर्यंत उचलण्यात आले होते. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणी पातळी वाढू लागल्याने रात्री दहा वाजता धरणाचे दरवाजे तीन फुटापर्यंत उघडून १६ हजार ५३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam latest water storage update
Koyna dam 19387 cusecs water release
Koyna Dam Water Release
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Marathi News Esakal
www.esakal.com