Koyna Dam Water Storage : महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी! कोयना धरणातील पाणीसाठा 100.92 टीएमसीवर; पूर्ण क्षमतेसाठी आणखी 4.33 टीएमसी पाण्याची गरज

Koyna Dam Water Storage Reaches 100.92 TMC : कोयना धरणातील पाणीसाठा १००.९२ टीएमसीवर पोहोचला आहे. पूर्ण क्षमतेसाठी ४.३३ टीएमसी पाण्याची गरज असून, पाऊस वाढल्यास धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.
Koyna Dam water storage 100.92 TMC latest news

Koyna Dam water storage 100.92 TMC latest news

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच असून, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टप्प्याटप्प्याने वाढत आहे. सध्या धरणात १००.९२ टीएमसी पाणीसाठा झाला (Koyna Dam water storage today) असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ४.३३ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग केला जात नसला, तरी पावसाचा जोर वाढल्यास कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com