Koyna Dam water storage 104.71 TMC
esakal
कराड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला (Koyna Dam water storage today) आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असली तरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या सुमारे 104.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी आता केवळ 0.54 टीएमसी म्हणजे अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.