Koyna Dam Latest Update : कोयना पाणलोट क्षेत्रात धुवांधार! पाणीसाठा 96.65 टीएमसीवर; धरणातून तब्बल 8,054 क्युसेकने विसर्ग सुरू, महाबळेश्वरात किती पाऊस?

Koyna Dam Water Storage Reaches 96.65 TMC : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरणातील पाणीसाठा 96.65 टीएमसीवर पोहोचला आहे. वाढत्या आवकेमुळे धरण व पायथा वीजगृहातून 8,054 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Mahabaleshwar rainfall impact on Koyna Dam

Mahabaleshwar rainfall impact on Koyna Dam

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. नवजा आणि कोयनानगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी (Koyna Dam water storage latest update) सुरू असून, दोन दिवसांच्या उघडीपीनंतर महाबळेश्वर परिसरातही गुरुवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोयना धरणात सध्या 96.65 टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण आणि पायथा वीजगृहातून मिळून 8 हजार 54 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com