Koyna Dam water level today live
esakal
कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत धरणात १.९२ टीएमसी पाण्याची भर पडली (Koyna Dam water storage 77.92 TMC) असून सोमवारी (ता. २७) सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातील एकूण पाणीसाठा ७७.९२ टीएमसी इतका झाला आहे.