Koyna Dam Earthquake Update
esakal
सातारा : राज्यातील प्रमुख भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक असलेल्या कोयना धरण परिसरात भूकंपाच्या हालचालींची नोंद करणारी यंत्रणा गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. त्यातच मंगळवारी (ता. २२) मध्यरात्रीपासून परिसरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के जाणवले. मात्र, कोयना येथील भूकंपमापन केंद्र बंद असल्याने या धक्क्यांची स्थानिक पातळीवर नोंद होऊ शकली नाही. परिणामी, धक्क्यांचा अचूक केंद्रबिंदू निश्चित करण्यात अडचणी निर्माण झाल्या.