Koyna Hydropower Project leakage
esakal
Koyna dam water leakage latest news : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक एक आणि दोनच्या सर्जवेलमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही गळती रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले, तरी अद्याप त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यात यश आलेले नाही. परिणामी, सह्याद्रीच्या डोंगरातून आजही धबधब्यासारखे पाणी वाहत असून, दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.